अटी व शर्ती
आम्ही आपले स्वागत करतो…
थोडक्यात माहिती:
‘एस. के. आर्ट्स प्रॉडक्शन’ हे कला क्षेत्रात कलाकारांच्या व निर्मात्यांच्या प्रगतीसाठी कार्य करते. आम्ही ‘एस. के. आर्ट्स प्रॉडक्शन’च्या माध्यमातून आपल्या कलागुणांना योग्य मार्ग दाखवून आपल्याला संधी मिळवून देण्यासाठी सतत कार्य करत असतो.
एस के आर्ट्स प्रोडक्शन नेहमीच वेगवेगळ्या संधी कलाकारापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत असते. त्यामुळे आत्ता पर्यंत अनेकांना संधीही मिळाल्या आहेत. आमचा विश्वास आहे की, आपण संघटीत झाल्यास आपल्या संधी नक्की वाढतील, म्हणूनच ‘एस. के. आर्ट्स प्रॉडक्शन’ मध्ये अॅक्टर सोबतच प्रोड्युसर, डायरेक्टर, म्युझिक डायरेक्टर, सिंगर्स, रायटर्स, पोस्ट प्रॉडक्शन टीम व सर्व प्रकारचे टेक्निशियन मेंबर्स आहेत. त्यामुळे प्रोजेक्टच्या कामाच्या संधी ‘एस. के. आर्ट्स प्रॉडक्शन’ मधील मेंबर्सलाच मिळतील.
एस के आर्ट्सचे वर्षभर वेगवेगळे उपक्रम, मार्गदर्शन चर्चा सत्र, वेगवेगळ्या विभागाची माहिती, कलाकारांच्या भेटी, नवीन प्रोजेक्ट साठी आपले प्रोफाईल व फोटो शेअर करणे, तुमच्या प्रोजेक्ट साठी सफोर्ट करणे, तुमच्या सिटीतील शूटिंग, फिल्म ऑडीशन अशा बऱ्याच सुविधा आपण रजिस्ट्रेशन केल्यावर मिळणार आहेत.
चला मग आपण एस के आर्ट्स परिवारात सामील होऊ या…
संधी:
- ‘एस. के. आर्ट्स प्रॉडक्शन’ मार्फत होणाऱ्या फिल्म प्रोजेक्ट मध्ये फक्त मेंबरलाच संधी दिली जाते.
- संधी सोबत आपल्याला आपले मानधनही दिले जाते.
- ईतर निर्मात्यांच्या फिल्म प्रोजेक्ट मध्ये आपल्याला संधी मिळण्यासाठी शिफारस केली जाते.
- आपण दिलेले फोटो वेगवेगळ्या प्रोड्युसर व डिरेक्टरला पाठवले जातात, त्यामुळे आपले प्रोजेक्ट मध्ये कास्टिंग होऊ शकते.
- आपण स्वत: करत असलेल्या प्रोजेक्ट मध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी एस के आर्ट्स ची टीम मदत करेन.
- फिल्म क्षेत्रातील आपले कौशल्य वाढवण्यासाठी वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन केले जाते.
- एस के आर्ट्सच्या प्रोजेक्ट मध्ये आपले कौशल्य दाखवण्यास पूर्ण चान्स दिला जातो.
- शिवाय तुम्ही इन्व्हाल असणाऱ्या एस के आर्ट्सच्या प्रोजेक्टसाठी सशक्त सोशल मिडीया वापरला जाणार, त्यामुळे आपली ब्रंडिंग होईल.
डिस्ट्रीक्ट विषयी :
- महाराष्ट्रात ‘एस. के. आर्ट्स प्रॉडक्शनचे प्रत्येक जिल्ह्यात डिस्ट्रीक्ट हेड आहेत. तेथील प्रत्येक मेंबर त्यांच्या संपर्कात असेल.
सोशल मिडिया:
वेबसाईट
www.skartsproduction.com या नावाने ‘एस. के. आर्ट्स प्रॉडक्शन’ची वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर ‘एस. के. आर्ट्स प्रॉडक्शन’च्या माहितीसोबतच विविध प्रोजेक्ट, लेटेस्ट प्रोजेक्ट, पदाधिकारी, मेंबर फॉर्म व संपर्क अशा माहिती शेअर केल्या आहेत.
लिंक: http://www.skartsproduction.com/
व्हॉटसअप ग्रुप:
‘एस. के. आर्ट्स प्रॉडक्शन’ नावाने आपला व्हॉटसअप ग्रुप आहे. त्यात कलाकारांना मिळणाऱ्या विविध संधींची चर्चा केली जाते. तसेच ‘एस. के. आर्ट्स प्रॉडक्शन’ने निर्माण केलेले प्रोजेक्ट ग्रुपवर शेअर केले जातात. ग्रुपवर शेअर केलेले प्रोजेक्ट हे प्रत्येक मेंबरने बघणे, कमेंट करणे व वेगवेगळ्या ठिकाणी शेअर करणे महत्वाचे आहे.
फेसबुक पेज:
‘एस. के. आर्ट्स प्रॉडक्शन’ या नावाने आपले फेसबुक पेज आहे. त्यावर विवध प्रोजेक्टचे फोटो, व्हिडीओ व काही यु ट्यूब लिंक शेअर केल्या जातात, त्यावर प्रत्येक मेंबरने आपली कमेंट नोंदवून ते विविध अकाऊंटवर शेअर करणे महत्वाचे आहे.
Link: https://www.facebook.com/skartsproduction/
यु ट्यूब:
‘एस. के. आर्ट्स प्रॉडक्शन’ या नावाने आपला यु ट्यूब चॅनेल आहे. त्यावर ‘एस. के. आर्ट्स प्रॉडक्शन’ने निर्माण केलेले किंवा आपल्या कलाकारांनी निर्माण केलेले किंवा वेगवेगळी माहिती देणारे, असे विविध प्रोजेक्टचे व्हिडीओ चॅनेलवर शेअर केले जातात. ते व्हिडिओ प्रत्येक मेंबरने पूर्ण बघणे व त्यावर प्रत्येक मेंबरने आपली कमेंट नोंदवून त्याची लिंक विविध अकाऊंटवर शेअर करणे महत्वाचे आहे.
Link: https://www.youtube.com/channel/UC5TOijgnhViisrrtByKLQ7g
धन्यवाद..!!