आमच्या विषयी
एस के आर्टस् प्रॉडक्शन ही एक चित्रपट निर्मिती संस्था असून, याची स्थापना १ जानेवारी २००३ रोजी पुणे, महाराष्ट्र येथे झाली. एस के आर्टस् हे सुरुवातीच्या काळात ‘शिवक्रांती कला प्रतिष्ठान’ नावाने प्रसिद्ध होते, कालांतराने ही संस्था एस के आर्टस् प्रॉडक्शन म्हणून नावारूपाला आली. आज ही संस्था “अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ” च्या नियमानूसार चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहे. एस के आर्टस् च्या माध्यमातून संपूर्ण चित्रपटाची निर्मिती केली जाते. त्यामध्ये कथा-पटकथा-संवाद-लेखन, संगीत, गीतलेखन, चित्रीकरण व्यवस्था, दिग्दर्शन, छायाचित्रण, संकलन, सेन्सॉर, प्रदर्शन आदी सर्व कामे केली जातात. त्याचप्रमाणे नृत्य, नाटक, लघुचित्रपट, जाहिरातपट, व माहितीपट निर्मिती सुद्धा केली जाते. एस के आर्टस् प्रस्तुत अनेक लघुचित्रपटांची निर्मिती केली. त्यातील ” एकलव्य”, ” हुंडा”, “कचरा”, “जाई”, “कंडाळो”, हे प्रसिद्ध लघुचित्रपट आहेत. काही चित्रपटांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
“राजे…एक क्रांती” व “सन १९८१” या व्यावसायिक चित्रपटांची निर्मिती एस के आर्टस् ने केली आहे. या चित्रपटातून राजदत्त, नागेश भोसले, मोहन जोशी, सुनील गोडबोले, शिवशाहीर बाबासाहेब पुरन्दरे, जयमाला इनामदार व गायक आदर्श शिंदे या दिग्गज कलाकारांसोबत कामे केली आहेत. या दोन्ही चित्रपटांना “NIFF” कडून अनुक्रमे ” Best Debut Director Award” व ” Best Gramin Film Award” हे पुरस्कार मिळालेले आहेत. एस के आर्टस् च्या निर्मिती सोबतच इतर निर्माते व प्रायोजक यांचे ही प्रोजेक्ट्स विश्वास पूर्वक केली जातात.
आपणास अभिमानाने सांगू इच्छितो कि, एप्रिल २०१९ पासून ‘एस के आर्टस’ने आपल्या स्वतःच्या ‘सन १९८१’ ह्या चित्रपटाद्वारे वितरण क्षेत्रात यशस्वीपणे पहिले पाऊल टाकले. २०२० मध्ये ही यशस्वी परंपरा पुढे सुरु ठेवत ‘काय बाय’ ह्या चित्रपटाचे वितरण देखील केले. पारदर्शक आणि विश्वासार्ह कार्यप्रणाली हे ‘एस के आर्टस’च्या सेवेचे ठळक मुद्दे आहेत ही गोष्ट सर्वमान्य आहे.
संस्थापक
माननीय शिवा बागुल हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक यशस्वी दिग्दर्शक आणि निर्माता आहेत. त्यांनी २००३ मध्ये एसके आर्ट्सची स्थापना केली. आपल्या प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून त्यांनी मराठी तसेच इतर भाषेतील चित्रपट दिग्दर्शित केले. वयाच्या १२ व्या वर्षी त्यांनी इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर बर्याच भूमिका साकारल्या. तथापि, त्यांना इच्छित संधी सहजासहजी मिळू शकली नाही म्हणूनच त्यांनी चित्रपट क्षेत्रातील संघर्ष करणार्या प्रतिभावंतांच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी नवीन प्रॉडक्शन हाऊस तयार करण्याचे ठरविले. हे लक्षात घेऊन त्यांनी जाने 2003 मध्ये एसके आर्ट्स प्रॉडक्शनची स्थापना केली. आपल्या संस्थेद्वारे त्यांनी बरेच चित्रपट आणि लघु चित्रपटांचे दिग्दर्शन केले. सहाय्यक अभिनेता, लेखक, गीतकार, संकलक, कॅमेरामन आणि दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी कामगिरी बजावली.
मा. शिवा बागुल नेहमी म्हणतात, “आपण इतरांची स्वप्न पूर्ण करीत असल्यास, आपले स्वप्न नक्कीच साकार होईल.”
- Best Gramin Chitrapat-NIFF 2016
- Best Debut Director-NIFF 2014
- Rangbhumi Seva Purskar- Akhil Bhartiy Natya Parishad, Pimpri-Chinchwad
- Kavya Purskar- Gnyankranti Santha, Pune
- Kavya Purskar- Maharashtra Sahitya Parishad, Pimpri- chinchwad
- Kavya Purskar- Khandesh Maratha Mandal, Pune
- Kavya Purskar- Kavyamitra Sanstha, Pune
- Mahakavi Wamandada Kardak Kavya Purskar- Rajshree Shahu Maharaj Santha, Pune
- Chha. Sambhajiraje Kalagaurav Purskar- Akhil Bhartiy Sahitya Parishad
- Krantijoty Savitribai Kala Gaurav Purskar- Akhil Bhartiy Mali Mahasangha
- Swami Vivekanand Kalaratna Purskar- Sanskar Pratisthan
- San 1981 (सन १९८१) - Movie - Writing/Direction
- Raje Ek Kranti (राजे एक क्रांती) - Movie - Acting/writing/Direction
- Todfod (तोडफोड) - Movie - Acting
- Vedana (वेदना) - Movie - Acting
- Aadesh (आदेश) - Movie - Acting
- Shaharatali Por (शहरातील पोरं) - Movie - Acting
- Aatmhattya- Script (आत्महत्या) - Movie - Writing
- Dnyanjyoti Savitribai Phule - Script (ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले) Writing
- Eklavya (एकलव्य) - Shortfilm - Writing/Direction
- Kachara (कचरा) - Shortfilm - Writing/Direction
- Hunda (हुंडा) - Shortfilm - Direction
- Ye kaisa aaya jamana (ये कैसा आया जमाना) - Shortfilm - Direction
- Chingi (चिंगी) - Shortfilm - Acting
- Jaee (जाई) - Shortfilm - Editing/Direction
- Kandalo (कंडालो) - Shortfilm - Editing/Direction
- Bhut- Script (भूत) - Shortfilm - Writing
- Mich mazya kavitetun (मीच माझ्या कवितेतून) Album - Direction
- Popat .Com (पोपट डॉट कॉम) - Album - Acting
- Wahato hi durvanchi judi (वाहतो ही दुर्वांची जोडी) Drama - Acting
- Saujanyachi ashitaishi (सौजन्याची ऐशीतैशी) - Drama -Acting
- Sakshatkar (साक्षात्कार) - Drama - Acting/Direction
- Balyache Vashtraharan (बाळ्याचे वस्त्रहरण) - Drama - Acting
- Pati gele kathewadi (पती गेले काठेवाडी) - Drama - Acting
- Meghmallhar (मेघमल्हार) - Drama - Acting
- Aaghat (आघात) - Drama - Acting/Writing/Direction
- Upekshit (उपेक्षित) - Drama - Acting
- Ashi hi hasava fasavi (अशी हे हसवा फसवी) - Drama - Acting/Writing/Direction
- Saksharata Aabhiyan (साक्षरता अभियान) - Drama - Acting
- Mr. Pratap (मिस्टर प्रताप) - Drama -ActWng/writing/Direction
- Anyay (अन्याय) - Drama -Writing
- Ha saaj marathmola (हा साज मराठमोळा) - Stage show -Acting/Writng/Direction
- Aai Fakt Tuzyachsathi (आई फक्त तुझ्याचसाठी) - Stage show -Acting/Writing/Direction
- Peshavai (पेशवाई) - Sireal - Acting
- Nandadip (नंदादीप) - Sireal - Acting
- Aagnihotra (अग्निहोत्र) - Sireal - Acting