SK Arts Production

भारतीय सिनेमाची इंडस्ट्रीची धुंदी उतरली…

कोविड-१९ मुळे संपूर्ण जगातील सिनेमा इंडस्ट्रीचे मोठे नुकसान झाले. भारतीय मराठी सिनेमा इंडस्ट्री आधीच आपल्या अडचणीतून वाट काढत पुढे येत होती. त्यात कोविड-१९ मुळे मराठी सिनेमा इंडस्ट्री पार ढवळून निघाली. कधी नाही, एवढे नुकसान या एका वर्षात या मराठी सिनेमा इंडस्ट्रीचे झाले. अनेक सिनेमाच्या शूटिंग थांबल्या. काही सिनेमे रिलीज साठी सज्ज होते, त्यांनाही थांबावे लागले. यामुळे प्रोड्युसरचा कोट्यावधी पैसा अडकला. त्यांचे सर्व अंदाज जागेवर थांबले. धुंदीत असणाऱ्याची धुंदी उतरली. इतर सर्व कलाकारांचे व टेक्निशयनचे हातचे काम गेले. पण हा काळ संपल्यावर सर्वांना पुन्हा उभे राहायचे आहे. म्हणतात ना, “हारकर जितनेवाले को बाजीगर कहते है ।”

भारतीय सिनेमा इंडस्ट्रीचा अभ्यास झाला…

      भारतीय सिनेमा इंडस्ट्रीतील आर्टिस्ट जे नेहमी आपआपल्या वर्क मध्ये सतत पळत होते, ते वर्क अचानक थांबले. या वेळेत निगेटिव्ह विचार करणारे रडत बसले, तर पॉझिटिव्ह विचार करणाऱ्यानी या वेळेचा सदुपयोग केला. आपले वर्क थांबल्यामुळे सर्वांना काहीसा वेळ मिळाला. या काळात अनेकांना अनेक नवीन गोष्टी शिकता येणाऱ्या होत्या. भारतीय सिनेमा इंडस्ट्रीत आलेले नवीन तंत्रज्ञान लर्न करता आले. नवीन काही कन्सेप्ट, ज्या वेळेअभावी लिहिण्याच्या राहून गेल्या होत्या, त्या लिहिता आल्या. या काळात प्रत्येकाला काहीसा अभ्यास करायला वेळ भेटला. OTT वरचे कन्टेन्ट बघून वेबसिरीज वेब सिनेमाचे तंत्र समजून घेतले. सिनेमांना मिळणारे वेगवेगळे राईटस, त्यातून मिळणारे उत्पन्न या गोष्टी समजून घेता आल्या.

सिनेमा इंडस्ट्रीतील सैराट थांबले…

      सैराट सिनेमा रिलीज झाल्यावर त्या सिनेमाने शंभर कोटी कमावले. तसाच सिनेमा आपणही बनवू व शंभर कोटी पेक्षा जास्त कमवू, असे म्हणणारे अनेक डायरेक्टर–प्रोड्यूसर पुढे आले होते. कोविड-१९ च्या आधी त्यांनी काहीसे सिनेमे बनवले. मात्र कोविड-१९ आला आणि या सर्व सैराटच्या धुंदीत सिनेमा बनवणारे डायरेक्टर–प्रोड्यूसर धाडकन जागे झाले. त्यांना त्यांच्या समोरील अडचणी लक्षात येऊ लागल्या. डोक्यातील सैराटची हवा निघून गेली. अनेक जण अडचनीत आले होते. कुणी जमीन विकून सिनेमा काढला होता, तर कुणी घर गहाण ठेवून काढला. त्यांना फक्त सैराटचा पैसा दिसला. त्या मागील मेहनत, तंत्रज्ञान, मार्केट नाही कळाले. त्यामुळे निर्माण झालेले सिनेमे हे दिशाहीन झाले. असे बरेच सिनेमे आता घरात पडून आहेत. सैराट सारखा पैसा कमवू म्हणणारे आता काही सिनेमे इंडस्ट्रीत पुन्हा दिसणारही नाहीत. आता जे डायरेक्टर–प्रोड्यूसर शिल्लक आहेत, त्यांनी सुद्धा बदलत्या मार्केटचा अभ्यास करूनच सिनेमे बनवणे गरजेचे आहे.

भारतीय सिनेमा इंडस्ट्रीला मिळाली नवी दिशा…

आता काय कारावे? असा मोठा प्रश्न समोर उभा राहिला. आपण केलेला सिनेमा थिएटरमध्ये रिलीज करण्यासाठी तयार केला, मात्र कोविड १९ मुळे सर्व थियटरच बंद झाले. आता पुढे काय? मात्र त्यामुळे OTT सारखे नवीन मोठे मार्केट पुढे आले. जे सर्वसामान्य डिरेक्टर/प्रोड्युसर यांना काहींना माहीतही नव्हते. थिएटरचा पर्याय बंद झाल्यावर OTT वर काही सिनेमे रिलीज झाले. तेव्हा सर्वांनीच तिकडे धाव घेतली. त्याच वेळी नवीन OTT पण काही निर्माण झाले. त्यामुळे डिजिटल राईट मधून निर्मात्यांना पैसे मिळू शकतात हे सर्वसामान्यांना कळाले. काहींनी मग काही OTT ना आपला सिनेमा विकला, तर काहींनी शेअरिंग बेस वर दिला. निर्मात्यांना नवीन मार्केट कळाले. जर कोविड-१९ आला नसता, तर याबद्दल इतके प्रबोधन झाले नसते. म्हणतात ना, अडचण आल्या की, माणूस बरोबर पर्याय शोधतो. थिएटर व्यतिरिक्त प्रोड्युसरला सिनेमा रिलीजसाठी एक उत्तम पर्याय म्हणून OTT एक माध्यम मिळाले.

सिनेमा इंडस्ट्रीला हार्दिक शुभेच्छा !

भारतीय सिनेमा इंडस्ट्रीतील अशा सर्व अभ्यासू डायरेक्टर–प्रोड्यूसर यांना नवीन प्रोजेक्टसाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा…!  नक्कीच नवीन प्रोजेक्ट करा, पण पूर्ण अभ्यास करून. आपला सिनेमा आपण कशासाठी करतोय? सिनेमा निर्माण झाल्यावर तो सिनेमा आपण थिएटर मध्ये की डिजिटल वर रिलीज करणार, हे आधीच ठरावा. त्यासाठी लागणारी मार्केट व्ह्याल्यू समजून घ्या. आपल्या प्रोजेक्टसाठी एक जाणकार मार्केटिंग घेऊन पुढे येणाऱ्या अडचणी आधीच सोढवा. हि टीम रायटिंग पासून तर प्रोड्युसरचा संपूर्ण पैसा वसूल होईपर्यंत सहभागी करून घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे योग्य स्क्रीनप्ले पासून तर, शूटिंग टेक्निशियन, कास्टिंग, पोस्ट प्रोडक्शन असे सर्वच योग्य होण्यास मदत होईल. आपण जर सिरियलच्या  शूटिंग सेटवर गेले असणार तर, तिथे सुद्धा चॅनलची एक क्रिएटिव्ह टीम सोबत असते. ती टीम चॅनलला हवे तसे बदल करून सिरियलचा प्रत्येक एपिसोड तयार करून घेते. त्यामुळे सिरियलची क्वालीटी वाढून TRP वाढण्यास मदत होते. त्या धर्तीवर नवीन डायरेक्टर/प्रोड्युसर यांनी काम केल्यास आपला  नक्की  होईल.

  • – शिवा बागुल, लेखक/दिग्दर्शक

youtube

facebook

Loading