माहितीपट
अनेक सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थांच्या स्थापने पासून आजवरच्या कार्याचा अभ्यास करून त्यांचा ध्येय व उद्दिष्ट्य यांवर माहितीपट निर्माण केले जातात. तसेच वेगवेगळ्या भागांतील परंपरा आणि प्रथांना अधोरेखित करण्यासाठीही माहितीपट बनवले जातात. भूतकाळ आणि वर्तमानातील बदल अधोरेखित करणारे माहितीपट, काही चमत्कारिक अथवा अनाकलनीय घटना, व्यवसाय, कला, उत्सव किंवा ठिकाणे ह्यांची माहिती देणारे माहितीपट देखील बनवले जातात.